top of page

चालू घडामोडी | हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच | What is IFCCT?

IFCCT_1763989155330.webp

हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच

Integrated Forum on Climate Change and Trade 

 

Subject : GS : जागतिक घडामोडी - जागतिक संघटना

 

सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच (IFCCT) कोणत्या परिषदेत लाँच करण्यात आला ?

1. COP28

2. COP29

3. COP30

4. COP31

उत्तर : COP30

 

 बातमी काय ?

• 15 नोव्हेंबर 2025 रोजी ब्राझील येथे झालेल्या COP30 परिषदेत Integrated Forum on Climate Change and Trade (IFCCT) या नवीन आंतरराष्ट्रीय मंचाची अधिकृत घोषणा झाली.

 

हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच म्हणजे काय ?
What is IFCCT ? 

• Integrated Forum on Climate Change and Trade (IFCCT) हा हवामान बदल आणि व्यापार धोरणे यांच्यात वाढणारे तणाव सोडवण्यासाठी देशांना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तयार केलेला राजकीय समर्थन असलेला आंतरराष्ट्रीय मंच आहे.

• व्यापार नियम आणि हवामान कृती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे.

 

IFCCT का तयार केला ?

• अनेक देशांमध्ये हवामान धोरणे आणि व्यापार नियमांमध्ये संघर्ष वाढत आहे; IFCCT हे प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देतो.

• विकसित देशांनी ठरवलेल्या कठोर व्यापार-हवामान नियमांमध्ये विकसनशील देशांचे हित बाजूला राहते; हा मंच विकसनशील देशांना समसमान बोलण्याची संधी देतो.

• जागतिक धोरणांमध्ये तुकडे होण्याऐवजी (Fragmentation) एकत्रता निर्माण करणे.

• हवामान वाटाघाटी जागतिक स्तरावर अधिक सुसंगत आणि एकमेकांशी जुळणाऱ्या बनावाव्यात यासाठी IFCCT मदत करेल.

 

IFCCT कसे चालेल ?

 

अध्यक्षपद : 

• ब्राझिल आणि एक विकसित देश मिळून या मंचाचे सह-अध्यक्ष (Co-Chairs)असतील.

• UNFCCC मधील सर्व सदस्य देशांसाठी हे मंच खुले आहे.

 

स्वतंत्र संस्था (Institutionally Independent) : 

• IFCCT हे जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) किंवा UNFCCC या दोन्ही संस्थांपासून पूर्णपणे स्वतंत्र असेल.

• म्हणजे ते कोणतेही व्यापार नियम बदलणार, बंधनकारक निर्णय देणार किंवा वाद सोडवणार नाही.

• IFCCT फक्त चर्चा, सल्ला व समन्वयासाठी आहे.

• येथे कोणतेही बंधनकारक करार, दंड किंवा न्यायनिर्णय होणार नाहीत.

 

अनेक गटांचा सहभाग : 

• नागरी समाज संस्था, व्यवसाय संघटना, संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय उपक्रम—सर्वांना चर्चा प्रक्रियेत सामावून घेतले जाईल.

 

IFCCT चे महत्त्व (Importance) : 

• हवामान बदलामुळे व्यापार धोरणे कठोर होत असताना, विकसनशील देशांचे हित जपणारे एक संतुलित व्यासपीठ उपलब्ध होणार.

• जागतिक व्यापार नियम हवामान कृतीशी सुसंगत करण्यासाठी हा मंच भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

 

COP30 म्हणजे काय ?

• COP चा फूल फॅार्म Conference of the Parties असा आहे.

• 30 म्हणजे ही COP ची 30 वी हवामान परिषद आहे.

• COP30 ही संयुक्त राष्ट्रांच्या UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) अंतर्गत वार्षिक हवामान परिषद आहे.

• येथे सर्व देश एकत्र येऊन पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतात.

bottom of page