top of page

चालू घडामोडी | RBI ने केली PRB ची स्थापना | RBI established PRB

PRB_1760074309900.webp

RBI ने केली PRB ची स्थापना
RBI established PRB

Subject : GS - अर्थशास्त्र
 
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीचे विनियमन आणि देखरेख करण्यासाठी स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड (PRB) हा कोणत्या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे ?
1. NPCI
2. BPSS
3. SEBI
4. PFRDA
उत्तर : BPSS (Board for Regulation and Supervision of Payment and Settlement Systems)
 
बातमी काय ? 
• भारतातील विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमचे नियमन आणि देखरेख करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड (Payments Regulatory Board (PRB)) ची स्थापना केली.
 
पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड कोणत्या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला ?
• भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड (PRB) हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या BPSS (Board for Regulation and Supervision of Payment and Settlement Systems) या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे.
 
पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ची स्थापना का करण्यात आली ?
• भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालींना अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्यासाठी
• वाढत्या डिजिटल व्यवहारांवर अधिक केंद्रित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी
• देशांतर्गत तसेच सीमापार पेमेंट्समध्ये विश्वसनीयता आणि स्थिरता राखण्यासाठी
 
PRB ला कायदेशीर आणि संस्थात्मक आधार :
• पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड (PRB) ला “भुगतान आणि निपटान प्रणाली अधिनियम, 2007” (Payment and Settlement Systems Act, 2007) अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
• PRB ही आता DPSS (Department of Payment and Settlement Systems) द्वारा समर्थित स्वतंत्र संस्था आहे.
• PRB ची ही रचना तिला अधिक स्वायत्त आणि सशक्त नियामक यंत्रणा (Autonomous and Strong Regulatory Mechanism) निर्माण करते.
 
पेमेंट रेग्युलेटरी बोर्डचे अध्यक्ष कोण ? 
Payments Regulatory Board (PRB) ची एकूण सदस्य संख्या किती ?
• पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ची एकूण सदस्य संख्या 6 आहे.
• भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डचे अध्यक्ष असतील.
• भारतीय रिझर्व्ह बँकेचे वर्तमान गव्हर्नर संजय मल्होत्रा हे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डचे सध्याचे अध्यक्ष असतील.
 
पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ची प्रमुख कार्ये कोणती ?
What are the main functions of the Payment Regulatory Board ?
 
• सर्व प्रकारच्या पेमेंट प्रणालींचे नियमन व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ला देण्यात आली आहे.
 
1) इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स :
उदाहरणार्थ : UPI, NEFT, RTGS, IMPS, कार्ड नेटवर्क्स
 
2) गैर-इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स :
उदाहरणार्थ : चेक समाशोधन प्रणाली (Cheque Clearing System)
 
3) घरेलू तसेच सीमापार व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
 
4) सार्वजनिक आणि खाजगी पेमेंट प्लॅटफॉर्म्स वर देखरेख ठेवणे.

bottom of page